जांभळीनाका होलसेल किराणा माल दुकानदारांवर निर्बंध – सोशल डिस्टान्स न पाळल्यामुळे दुरध्वनीवरुन घ्यावी लागणार ऑर्डर

जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट बंद करण्याबरोबरच तेथील होलसेल किराणामाल दुकानदार सोशल ‍डिस्टन्स पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज येथील दुकानदारांना थेट विक्री करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला.

Read more

तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे तपासणीची मोफत सुविधा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तत्पर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून आता शहरातील खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वतःच्या घरातून थेट व्हिडिओ कॉल द्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

Read more

जिल्ह्यातील भाजी मंडई, बाजार, फळ बाजार तसंच भाजीपाला दुकाने १४ एप्रिल रात्री १२ पर्यंत बंद

जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद तसंच नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे आणि भाजीपाला दुकाने काल रात्री बारा वाजल्यापासून मंगळवार दिनांक 14 एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आडकाठी केल्यामुळे मुंब्र्यामधील दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

ठाण्यातील शिवाजी तसंच जिजामाता मंडईचं ४ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर

कोरोना कोव्हीडचा संसंर्ग लोकांमध्ये पसरू नये यासाठी वारंवार सूचना देवूनही सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी करून हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या विविध भागांमध्ये हलविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

Read more

कोरोना संदर्भात समाज माध्यमांवर खोट्या बातम्या अथवा अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा

कोरोना संदर्भात समाज माध्यमांवर खोट्या बातम्या अथवा अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.

Read more

काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रुगणालयात संशयित आणि कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने अशी रूग्णालये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली आहेत यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालय बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी डायलेसीस रुग्णांची गैरसोय होत असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या डायलेसीस रुग्णांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

Read more

करोना सेंटर्स मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना विमा संरक्षण देण्याची संजय केळकर यांची मागणी

राज्यात करोना सेंटर्स मध्ये हजारो प्राथमिक शिक्षक काम करत असून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविकाना जस शासनाने विमा संरक्षण दिले आहे तसेच प्राथमिक शिक्षकाना द्या अशी मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे संस्थापक, आमदार संजय केळकर आणि राज्य शाखेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली.

Read more

हरियाना सरकारप्रमाणेच राज्यातील आरोग्य सेवेतील कर्मचा-यांचं वेतन दुप्पट करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय तसंच अशासकीय सेवेतील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना हरियानाप्रमाणेच दुप्पट वेतन देण्याबरोबरच राज्यातील पोलीसांना वेळेवर वेतन कसं मिळेल याची दक्षता घेऊन त्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्याची मागणी ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Read more

परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित काळात चालवल्या जाणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत.

Read more