करोना सेंटर्स मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना विमा संरक्षण देण्याची संजय केळकर यांची मागणी

राज्यात करोना सेंटर्स मध्ये हजारो प्राथमिक शिक्षक काम करत असून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविकाना जस शासनाने विमा संरक्षण दिले आहे तसेच प्राथमिक शिक्षकाना द्या अशी मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे संस्थापक, आमदार संजय केळकर आणि राज्य शाखेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून शासन परिपत्रकात याचा त्वरित उल्लेख करावा अशी मागणी केली असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले करोना सेंटर्स मध्ये प्राथमिक शिक्षकांची मदत करण्यासाठी नेमणूक झाली असून हजारो शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत असेही राजेश सुर्वे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading