जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ बाधित रुग्णापैकी २ रुग्ण हे वैदयकीय चाचण्या नंतर निगेटिव्ह

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ बाधित रुग्णापैकी २ रुग्ण हे वैदयकीय चाचण्या नंतर निगेटिव्ह आल्याने स्वगृही परतले आहेत. तर एकाचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे.

Read more

पंचायत समिती स्तरावर ५० बेडचे विलगीकरणं कक्ष तयार करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक पंचायत समिती स्तरावर किमान ५० बेड असणारा विलगीकरणं कक्ष तयार करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी गट विकास अधिका-यांना दिले आहेत. त्यांनी काल दृकश्राव्य माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणाची आढावा बैठक घेतली.

Read more

ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरुग्ण विभाग सुरु

ठाणे शहरात कोरोना कोव्हीड -१९ या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी आणि रुग्णांची तात्काळ तपासणी करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ठाणे शहरामध्ये प्रभाग समितीनिहाय 15 महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये तर 5 खासगी रूग्णालये अशा एकूण 20 ठिकाणी ताप बाहयरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

Read more

ठाण्यातील बेथनी रुग्णालय ‘कोव्हीड सिमटोमॅटिक रुग्णालय’ म्हणून घोषित

ठाणे शहरात कोविड-१९ या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संशयित आणि निश्चित निदान झालेल्या रुग्णांचे नॉन कोव्हिड रुग्णांमध्ये संक्रमण टाळण्यासाठी कोव्हिड लक्षणे तसेच मधुमेह, किडनी आणि इतर व्याधी असलेल्या आणि प्रकृती अस्थिर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाण्यातील बेथनी रुग्णालय ‘कोव्हीड सिमटोमॅटिक रुग्णालय’ म्हणून घोषित करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. बेथनी रूग्णालयाच्या … Read more

फिल्डवर असलेल्या पोलीस आणि पत्रकारांची कोरोना तपासणी साठी टेस्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणीला खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली. यात गेल्या 5 दिवसांत 800 पोलीस आणि 200 पत्रकारांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ठाणे महापालिका पत्रकार संघ, उल्हासनगर महापालिका पत्रकार संघ, … Read more

कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या ठाणे ग्रामीणच्या व्यक्तीचे लोकांनी केले उत्स्फूर्त स्वागत

रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येताच, परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरात राहून, गॅलरित, गच्चीत, खिडकी जवळ येऊन उस्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या ठाणे ग्रामीणच्या व्यक्तीचे स्वागत केले.

Read more

ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आनंददायी आणि नाविन्यपुर्ण अध्ययन सुरू ठेवा – शेषराव बडे

कोरोनामुळे सर्व माध्यमिक शाळा बंद आहेत मात्र काही दिवसांपासून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद निर्माण व्हावा या हेतूने ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Read more

अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतुकदार यांनी मास्क वापरणे आवश्यक -जिल्हाधिकारी

नागरिकांनी अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतुकदार यांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Read more

संचारबंदीच्या काळात मदत केंद्र आणि निवारा गृहांमध्ये अडकलेल्या कामगारांचे वैज्ञानिक समुपदेशन करण्यात येणार

कोरोना विषाणूबाबत माध्यमे आणि सोशल मिडीयावर सातत्याने येणारी माहिती आणि त्याचे आकलन यात अंतर पडत असल्याने अनेकांच्या मनात भितीने ताण वाढत आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे संचारबंदीच्या काळात मदत केंद्र आणि निवारा गृहांमध्ये अडकलेल्या कामगारांचे वैज्ञानिक समुपदेशन करण्यात येणार आहे.

Read more