परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित काळात चालवल्या जाणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत. आवश्यकता वाटल्यास बसेसची संख्या कमी अथवा वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये ही कार्यवाही करण्यात येत आहे. भाईंदर पाडा ते ठाणे स्टेशन, धर्माचा पाडा ते ठाणे स्टेशन, कोलशेत ते ठाणे स्टेशन, पवार नगर ते ठाणे स्टेशन, लोकमान्य ते ठाणे स्टेशन, वागळे ते ठाणे स्टेशन, भारत गिअर्स ते ठाणे स्टेशन, टिकुजीनीवाडी ते ठाणे स्टेशन, उपवन ते ठाणे स्टेशन, भूनिएकर ते ठाणे स्टेशन, दादलानी ते ठाणे स्टेशन, आनंद नगर ठाणे स्टेशन, वाघबीळ ते ठाणे स्टेशन, वृंदावन ते ठाणे स्टेशन, कळवा ते ठाणे स्टेशन आणि दिवा ते कळवा स्टेशन अशा या बसेस धावणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading