ठाण्यातील शिवाजी तसंच जिजामाता मंडईचं ४ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर

कोरोना कोव्हीडचा संसंर्ग लोकांमध्ये पसरू नये यासाठी वारंवार सूचना देवूनही सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी करून हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या विविध भागांमध्ये हलविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. सिंघल यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत जांभळी नाका मार्केटची पाहणी केली. यापूर्वीही त्यांनी या मार्केटची पाहणी करून तेथील घाऊक आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्याविषयी सुचित केले होते. त्यानंतर मुख्य मार्केट बंद करून ते तलाव पाळी आणि सुभाष पथ याठिकाणी मार्किंग करून तिथे स्थलातंरित करण्यात आले होते. याबाबत महापालिका आणि पोलिस प्रशासनाने अनेकवेळा हस्तक्षेप करूनही सोशल डिस्टन्स नियमाचे उल्लघंन झाल्याने अखेर पाहणी करून महापालिका आयुक्त सिंघल यांनी हे भाजीपाला मार्केट शहराच्या विविध भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. हे भाजीपाला मार्केट आता पारसिक रेतीबंदर, पोखरण रोड नं.1, हायलँड मैदान आणि घोडबंदर रोड येथील डी मार्टच्या मागील बोरिवडे मैदान या ठिकाणी स्थलातंरित करण्यात येणार आहे. या चारही ठिकाणी आवश्यक त्या किमान सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी संबंधित विभागाला आदेशित केले आहे. कालच जांभळी नाका होलसेल मार्केट हलवण्या संदर्भात व्यापारी, पोलिस आणि महापालिका अधिका-यांच्यात बैठक झाली होती. त्यानुसार जांभळी नाका मार्केट ४ ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला मात्र तरीही मार्केट मधील गर्दी काही केल्या कमी होत नव्हती. महापालिकेचे अधिकारी भोंग्याच्या साह्याने सोशल डिस्टन्सींगची सुचना करत होते तरीही ठाणेकर आणि दुकानदार सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवताना दिसले यामुळे महापालिका अधिका-यांनी दुकानदारांना नोटीसाही दिल्या होत्या. आता शिवाजी आणि जिजामाता मंडई ही पारसिक रेतीबंदर, ढोकाळी मैदान, कॅडबरी ते वर्तक नाका आणि हायलँड मैदान या ठिकाणी हलविण्यात आली आहे. ठाणेकरांनी शिस्त न पाळल्यामुळं शेवटी ठाणेकरांचीच गैरसोय होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading