केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेंत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा

कोची केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेंत ठाणेकर जलतरणपटूंनी आपला दबदबा निर्माण केला. कोची केरळ येथील पेरियार नदीत लांबपल्ल्याची जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारत मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी १६ किमी , १० किमी , ६ किमी , २ किमी, ४०० मिटर अशा विविध अंतरआमध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ४ देशातील ६१० स्पर्धकांचा समावेश होता. यात ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन चे ११ जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १६ किमी गटात स्टारफिश फाउंडेशनच्या मानव मोरे याने १८ वर्षावरील गटात प्रथम क्रमांक पटकावला. १६ किमी संपूर्ण मुलांच्या गटात आयूष तावडे याने तृतीय क्रमांक आणि सोहम पाटील याने चौथा क्रमांक पटकावला. १६ किमी मुलींच्या संपूर्ण गटात स्नेहा लोकरे हीने द्वितीय क्रमांक पटकावला. १० किमी स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात कैवल्य राणे याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच संपूर्ण १० किमी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १० किमी मुलींच्या गटात श्रृती जांभळे हिने ४ था क्रमांक पटकावला. ६ किमी स्पर्धेत मुलीच्या १८ वर्षांखालील गटात आयुषी आखाडे हिने प्रथम क्रमांक तर १२ वर्षाखालील गटात किमया गायकवाड हिने द्वितीय क्रमांक पटकावला. २ किमी मुलांच्या स्पर्धेत ओजस मोरे याने ४ था तर मुलींचा १२ वर्षाखालील गटात माही जांभळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. ४०० मिटर संपूर्ण स्पर्धेत शर्वण पेठे याने प्रथम क्रमांक पटकावला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading