जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम मिशन मोडवर राबविण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांनी दोन पाऊले पुढे येण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या जीवनात दर्जात्मक आणि गुणात्मक सुधारणा घडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात हा उपक्रम मिशन मोडवर राबविण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांनी दोन पाऊले पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

जलयुक्त शिवार टप्पा 2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची कामे तातडीनं सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जिल्ह्यातील पाणीस्त्रोताचे बळकटीकरण करण्यासाठी जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच यापूर्वी केलेल्या कामांमधील दुरुस्तीची कामेही सुरू करावीत. ही कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिले.

Read more

डवले गाव येथे नायब तहसिलदारासह तलाठ्यावर भुमाफियांचा हल्ला

मुब्र्यांमधील डावले गाव येथे नायब तहसिलदार आणि तलाठ्यावर हल्ला होण्याचा प्रकार घडला.

Read more

जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारती तातडीने रिकामे करण्याची कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यात धोकादायक इमारती पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नियोजन प्राधिकरणांनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारती रिकामे करण्यात यावे. तसेच अशा इमारतींमधील रहिवाशांना पर्यायी ठिकाणी हलवून इमारत निष्कासित करण्याची कार्यवाही करावी. तसेच दर्जाहिन बांधकाम असलेल्या इमारती आणि अनधिकृत इमारतींचीही तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

Read more

मान्सूनपूर्व कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मान्सूनमध्ये जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये आणि दुर्देवाने आपत्ती आली तरी त्याचे परिणाम तीव्र होऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणांनी काळजी घ्यावी. प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावेत. तसेच मान्सूनपूर्व करावयाची कामे 31 मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी साधला जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद

आनंदाचा शिधा, शिवभोजन, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी बोनस या योजनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

Read more

नायब तहसिलदारांची फिल्मी स्टाईलने कारवाई – भुमाफियावर असणार करडी नजर

कासारवडवली मधील ट्रॉपिकल लगून परिसरात शासकीय भूखंडावर अनधिकृतपणे ४० घरांची उभारणी करण्यात आली होती,हि ४० घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली असून, कलेक्टर लँड वर बांधण्यात आलेल्या ह्या घरांवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.

Read more

जन्म मृत्यू नोंदणीसाठी शासकीय स्थळांचाच वापर करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.

देशात काही ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे बनावट फसवी संकेत स्थळ तयार करून त्यावरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र अदा करून सर्वसामान्य जनतेचे फसवणूक करणे सुरू आहे. तरीही शासकीय संकेत स्थळांचाचं उपयोग करावा असा आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल आहे.

Read more

मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत आणि खारेगाव पुलाच्या दुरुस्ती काळात पर्यायी मार्गाचे सुयोग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम येत्या एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच साकेत – खारेगाव खाडीपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही पुढील महिन्यात करण्यात येणार आहे.

Read more

प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महाविद्यालयात शासकीय योजनांचा जागर

अनुसूचित जाती जमाती आणि नवबौध्द घटकांसाठी असलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसंच या घटकांना त्याचा लाभ कशाप्रकारे घेता येईल याची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली जात आहे.

Read more