विकासकामाअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांची कामे 60 ते 70 टक्के पूर्ण – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रभाग समितीनिहाय विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेली कामे 60 ते 70 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने युध्दपातळीवर काम करण्याचे निर्देश देत असतानाच रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वकच झाली पाहिजेत अशा सूचना त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती.

Read more

शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. स्वच्छता आणि सौंदर्यीकरण याबाबत शहराने कात टाकली असून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत स्वच्छ शौचालय अभियान देखील हाती घेण्यात आले आहे.

Read more

धोकादायक फांद्या तोडणं म्हणजे झाड तोडणं नव्हे – भान ठेवून झाडाच्या फांद्या तोडण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन

झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडणे म्हणजे झाड बुंध्यापासून कापून ते झाड उद्ध्वस्त करणे नव्हे, याचे भान ठेवून झाडांच्या फांद्या तोडल्या जाव्यात, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उद्यान विभागाला दिल्या आहेत.

Read more

नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको – महापालिका आयुक्त

नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको. सगळे नाले ९० टक्के नव्हे तर १०० टक्के साफ झाले पाहिजेत, हेच डोक्यात ठेवून काम करावे, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिल्या आहेत.

Read more

ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील येथील सबवे लवकरच खुला होणार

पूर्व द्रुतगती महामार्गावरील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील सबवेचे काम पूर्ण होत आले आहे. हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे. सब वे, त्याखालील नाला तसेच ज्ञानसाधना महाविद्यालया शेजारील रस्ता या कामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

Read more

ठाणे महापालिकेची १०० कोटींची भरारी – मालमत्ता कराचा विक्रमी भरणा

मालमत्ता कराच्या विक्रमी वसुलीचा ओघ कायम ठेवत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसात १०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे.

Read more

नाले सफाईबाबतच्या सूचना आणि तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

शहरात सर्वत्र सुरू असलेली पहिल्या टप्प्यातील नाले सफाईची कामे २५ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच नाले सफाईबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना तक्रारी यांची तातडीने दखल घेवून त्यावर उपाय करावा असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना १५ जूनच्या आधी पुस्तके मिळावीत – महापालिका आयुक्तांचे निर्देश

ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी १५ जूनच्या आधी क्रमिक पुस्तके मिळायला हवीत असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शालेय विभागाला दिले आहेत.

Read more

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more

महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सीवर लाईन सफाईची कामे करतांना संबंधित सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणारे कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी

महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सीवर लाईन सफाईची कामे करतांना संबंधित सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणारे कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read more