काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रुगणालयात संशयित आणि कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने अशी रूग्णालये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली आहेत यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालय बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी डायलेसीस रुग्णांची गैरसोय होत असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या डायलेसीस रुग्णांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयात दररोज 50 हून अधिक रुग्णांचे डायलेसीस होत होते. मातर, सद्यस्थीतीत हे रुगणालय बंद असल्यामुळे डायलेसीस होणार की नाही तसेच सध्या कोरोनामुळे देखील रुगणांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंब्रा येथील काळसेकर रुगणालयात डायलेसीस उपचार घेत असलेल्या रुग्णांची गैरसोय होवू नये त्यांची पर्यायी व्यवस्था ठाण्यातील महापालिकेचे वाडिया हॉस्पीटल, कोपरी येथील लखीमचंद फतिमचंद रुग्णालय तसेच हाजुरी येथील जितो रुग्णालय येथे करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. याबाबत काळसेकर रुग्णालयातून डायलेसीससाठी असलेल्या रुग्णांची यादी मागविण्यात आली असून त्यानुसार दररोज महापालिकेच्या आरोग्य ‍विभागातून या रुगणांशी संपर्क साधून त्यांना डायलेसीस केले जाणार आहे, यासाठी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या रुगणाला घरापासून थेट रुग्णालयात नेले जाणार आहे आणि डायलेसीस नंतर पुन्हा घरी सोडले जाणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी युध्दपातळीवर रुग्णसेवा देत असून इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी सज्ज झाली असून याकामी सर्वांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading