मतदानाच्या जागृतीसाठी पोतराजही मैदानात

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता या उपक्रमामध्ये पोतराजही सहभागी झाला असून आपल्या कलेद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. ठाणे शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे तेथे पोतराजचे आगमन झाले. त्यांनी मतदान जनजागृतीचे फलक पाहिले, घोषणा ऐकल्या. पोतराजाने स्वतःहून स्वीप पथकास म्हणला, की आपण सर्व हे लोकशाही बळकट आणि मतदान टक्का वाढण्यासाठी कार्यक्रम करत आहात. मी पण एक पोतराज आहे आणि पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक असतो. पोटासाठी मी आसूड घेऊन नाचतो, पण मी आपल्या देशासाठी मतदान करणार, मतदान माझा अधिकार आहे.
यावेळी पोतराज यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व सांगितले. पोटाचे खळगे भरण्यासाठी तो पोतराज स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढत होता आणि एकीकडे मतदान माझा अधिकार आहे, असे म्हणत तो गाण्यातून सर्वाना मतदान करण्याचे आवाहन करत होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading