विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधिश अभय मंत्री, जिल्हा आणि सत्र न्यायाधिश अमित शेटे, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर इश्वर सुर्यवंशी हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.

Read more

दुबई येथे झालेल्या कराटे स्पर्धेत कशिश तडवीला सुवर्णपदक

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय दुबई बुडोकॉन कप ऑल स्टाईल कराटे चॅम्पियन शिप सिलिकॉन ओसिस स्पर्धेत कशिश तडवीला घवघवीत यश मिळालं. 

Read more

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत चार शहरात ठाण्याची निवड

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ठाण्यात या योजनेचे चांगले काम झाले आहे. अर्थात, केवळ उद्दिष्ट पूर्तता हे लक्ष्य न ठेवता बचत गट, पथ विक्रेते यांच्या समस्या सोडविण्यावर आता पालिकेच्या समाज विकास विभागाने लक्ष द्यावे, अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वनिधी महोत्सव’ कार्यक्रमात केली.

Read more

गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचं आयोजन

ठाण्यातील आंबा महोत्सव यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम करून शेतकऱ्याना मदतीचा हात देण्यासोबतच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम आमदार संजय केळकर करीत आहेत अशी प्रशंसा करून ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अशा प्रकारचे महोत्सव मुंबईतही व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

Read more

एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात

गायमुख पोलीस चौकीजवळ आज सकाळच्या सुमारास एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात झाली आहे तर रिक्षाचालक गंभीररित्या भाजला आहे.

Read more

भिवंडी दुर्घटनेत अकरा जखमी तर दोन मृत

आज दिनांक २९/०४/२०२३ रोजी १३:०० वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स (तळ+०३ मजली इमारत, अंदाजे १० वर्षे जुनी इमारत) ही इमारत कोसळली आहे. या सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.-सदर घटनास्थळी प्रांत … Read more


भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार … Read more

महाराष्ट्र दिनी ठाणे महापालिका ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार, ०१ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ०१ मे रोजी सकाळी ७.१० मिनिटांनी राष्ट्रध्वजारोहण समारंभ पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात होईल. याच समारंभात महापालिकेत कार्यरत असलेल्या गुणवंत सफाई कामगारांचा आयुक्त श्री. बांगर … Read more

सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात रविवारपासून “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा उपक्रम

सदृढ आरोग्यासाठी…. चला आनंदपथावर
आपण सारे नाचू-गाऊ, योगा आणि आपले खेळ खेळूया. या शिर्षकाअंतर्गत “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. धनुष्यबाण न घेता भाऊ, पत्नी, भक्त आणि अनुयायांच्या सान्निध्यात रममाण झालेल्या श्री रामाची विविध रूपे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना पाहता आली. या चित्रप्रदर्शनाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more