विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधिश अभय मंत्री, जिल्हा आणि सत्र न्यायाधिश अमित शेटे, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर इश्वर सुर्यवंशी हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. महेश बेडेकर यावेळी हजर होते. अभय मंत्री यांनी यावेळी विद्यार्थ्यांना न्यायाधिश होण्यासाठी आवश्यक असलेला प्रयत्न, अभ्यास आणि कष्ट घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी न्यायाधिशाची भुमिका काय असते याची माहीती दिली. डॉ. बेडेकर यांनी विद्यार्थ्याना महाविद्यालयाशी आयुष्यभरासाठी संबंध प्रस्थापित करुन महाविद्यालयामध्ये असलेल्या नवनवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं. यावेळी जवळपास १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच वार्षिक पारितोषिकंही देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading