एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात

गायमुख पोलीस चौकीजवळ आज सकाळच्या सुमारास एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात झाली आहे तर रिक्षाचालक गंभीररित्या भाजला आहे. रिक्षा चालक राजकुमार यादव याचा रिक्षावरील ताबा सुटल्यानं तो रस्ता दुभाजकाला धडकला आणि या धडकेमुळं मोठी आग लागली. यामध्ये प्रवासी महिला जळून भस्मसात झाली असून रिक्षा चालकही गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दलानं धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. या रिक्षामधून चालक आणि एक महिला प्रवास करत होते. रिक्षा चालकास गंभीर दुखापत झाल्याने उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी त्याला जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. तर अपघातग्रस्त रिक्षेमध्ये अडकल्यानं महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading