महाराष्ट्र दिनी ठाणे महापालिका ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार, ०१ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ०१ मे रोजी सकाळी ७.१० मिनिटांनी राष्ट्रध्वजारोहण समारंभ पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात होईल. याच समारंभात महापालिकेत कार्यरत असलेल्या गुणवंत सफाई कामगारांचा आयुक्त श्री. बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. त्यानंतर, शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी स. १० वाजता ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’ या उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे हा कार्यक्रम होईल. संवादापूर्वी राज्य सरकारचे पुरस्कार मिळालेल्या महापालिकेच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा कौतुक सोहळा होणार आहे. आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे महापालिकेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही केले जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading