सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात रविवारपासून “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा उपक्रम

सदृढ आरोग्यासाठी…. चला आनंदपथावर
आपण सारे नाचू-गाऊ, योगा आणि आपले खेळ खेळूया. या शिर्षकाअंतर्गत “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना महामारी नंतर संपूर्ण जग थांबले, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या यावर उपाय म्हणून ठाणे महापालिका,ठाणे पोलीस आयुक्तालय आणि माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून ‘आनंदपथ’..रस्ता आरोग्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड आणि शेजारी असलेल्या उद्यानामध्ये दर रविवारी पहाटेपासून हा उपक्रम होणार आहे. यामध्ये विविध खेळ,साहित्य, कला, गायन, वादन असे विविध प्रकार सादर करण्यात येणार असून.अधिक संस्था ड्रम सर्कल, जिमनॅस्टिक, पंजा लढविणे, शिवकालीन स्केचिंग, दोरिच्या उड्या, मल्लखांब, क्रॉस फिट, मातीकाम, नृत्य होणार आहे.तसेच येऊर गावातील काही तरुण भोवरा,लगोरी, लेझीम सादर करणार आहे. यामध्ये नागरिकांना देखिल सहभाग घेता येईल. या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त जगजीत सिंग यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading