महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव ठाणेकरांसाठी खुला करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव सार्वजनिक करून तो ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापौरांकडे केली आहे.

Read more

समन्वय प्रतिष्ठानच्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समन्वय प्रतिष्ठान आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मो. ह. विद्यालयात आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या परीश्रमास यश

डोंबिवली एम आय डी सी निवासी विभागातील रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या परीश्रमास यश आले आहे.

Read more

मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच आरक्षण गेल्याचा नारायण राणेंचा आरोप

महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

कल्याणमधील दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिका आणि राजणोली उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

कल्याण- कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

तमिळ अभिनेत्रीचे लसीकरण परदेशी जाणारे विद्यार्थी वाऱ्यावर – भारतीय जनता पक्षाची टीका

महापालिकेच्या लसीकरण मोहिमेतील गोंधळाचे नवनवे प्रकार उघडकीस येत असून यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कुपनची पळवापळवी सुरू होती. आता चक्क तमिळ, तेलगू अभिनेत्रीचे लसीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गैरप्रकारात आरोग्य कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट घेतलेली कंपनी सहभागी असून, शिवसेना आणखी किती काळ संबंधित कंपनीला पाठिशी घालणार आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

शिवसेनेचे माजी ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांचा शिवसेनेला राम राम

शिवसेनेचे माजी ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी शिवसेनेला राम राम ठोकला असून जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

Read more

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार फलकबाजी

भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळात इंधन दरवाढीचा आलेख वाढतच असून या महिन्यात १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यात जोरदार फलकबाजी करण्यात आली.

Read more

ग्लोबल रुग्णालयाच्या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची संजय केळकरांची मागणी

ग्लोबल कोविड सेंटरच्या कंत्राटदाराच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी पुढे येत असून याबाबत चौकशी करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

रिक्षाचालकांच्या मदत अर्जांसाठी संजय वाघुलेंच्या वतीने शिबिर

राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत मिळविण्यासाठी दाखल कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाबाबत माहिती आणि मदत करण्यासाठी नगरसेवक संजय वाघुले यांच्या वतीने आजपासून ३० मे पर्यंत शिबिर सुरू करण्यात आले आहे.

Read more