महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या परीश्रमास यश

डोंबिवली एम आय डी सी निवासी विभागातील रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या परीश्रमास यश आले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या परीसरातील तसेच निवासी क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. हे रस्ते एमआयडीसीने सन १९८७ मध्येच कल्याण डोंबिवली महापालिकेकडे वर्ग केले असून त्यावेळेपासून महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होत असे. परंतु, सन २००२ साली या रस्त्यांचा समावेश असलेली २७ गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतींनी सदर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे अपेक्षित होते. परंतु, हे काम झाले नाही. २०१५ साली आजदे, एमआयडीसी विभाग महापालीकेत समाविष्ट केला गेल्यामुळे हे रस्ते परत महापालिकेच्या ताब्यात गेले. त्यामुळे या रस्त्याचे काम एमआयडीसीने करावे का महापालिकेने करावे हा वाद दोन्ही प्रशासनामध्ये सुरु होता. खासदार श्रीकांत शिंदें गेली ५ वर्षे सदर रस्ते व्हावेत म्हणून सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न करत होते. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी मात्र स्पष्ट आणी खंबीर भूमिका घेतली, कि आज नागरीकांना यातना सोसाव्या लागत आहेत त्यातून त्यांची सुटका तातडीने व्हायला हवी असा आपला आग्रह आहे त्यामुळे हा वाद निरर्थक असून दोन्ही प्रशासनाने या कामासाठी खर्च करावा पण हे रस्ते तातडीने करावेत अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्यांची पाहणी केली आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी ५०-५० टक्के खर्च करावा असा आदेश दिला. त्यानुसार या रस्त्याच्या खर्चाचा अंदाजे खर्च तयार करून सुमारे ११० कोटी रुपयांच्या प्रस्तावास एमआयडीसी ने मंजूरी दिली.
त्यानुसार सर्वसाधारण सभेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाद्वारे नुतनीकरण करणेकरिता महापालिकेच्या वाट्यातील ५०% रक्कम, म्हणजे रु. ५५.१५ कोटी मऔवी महामंडळास वर्ग करण्यासाठीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. हि बाब लक्षात घेता खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः आपल्या स्तरावर महापालिकेस निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करीत होते, त्यास यशही प्राप्त झाले. त्यास सकारात्मक प्रतिसाद म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्ते सयुंक्तपणे विकसित करण्याचा कामास प्रशासकीय मंजुरी देऊन एकूण अंदाजित रक्कम ११०.३० कोटी पैकी ५०% अनुदान रक्कम ५७.३७ कोटी अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेला वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकासकामे थांबू नये यासाठी खासदार शिंदे यांनी शासन दरबारी १५.५५ कोटीची मागणी केली होती. शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कल्याण डोंबिवलीसाठी १५.५५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळवली आहे. क.डों. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या निधीतून मुलभूत सुविधा मिळण्यास मदत होईल. तसेच येणाऱ्या काळातही विविध योजनाअंतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणण्यात येईल, त्यासाठी शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी सुद्धा लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरु केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच सुरु करून कल्याण डोंबिवलीकरांच्या सेवेत रुजू करण्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading