महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव ठाणेकरांसाठी खुला करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव सार्वजनिक करून तो ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापौरांकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात पांचपाखाडी येथील भूखंडावर महापालिका आयुक्तांचा बंगला असणं आवश्यक असताना हा बंगला वेगळ्याच जागेवर कसा बांधण्यात आला, महापालिका आयुक्तांचा बंगला हा ॲमेनिटी भूखंडावर जर बांधला असेल तर तो सार्वजनिक हितासाठीच वापरणं बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्रामध्ये बारा बंगल्याच्या ऐतिहासिक परिसरात तरण तलाव नाही मग आयुक्तांच्या बंगल्यातच तरण तलाव का असा प्रश्न धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेचे पहिले आयुक्त श्रीनिवास सोहोनी, गोविंदस्वरूप हे आपल्या कुटुंबाला मारोतराव शिंदे तरण तलावावर पोहायला घेऊन जायचे. असं असताना पालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव हा सर्वसामान्य ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी महापौरांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading