रिक्षाचालकांच्या मदत अर्जांसाठी संजय वाघुलेंच्या वतीने शिबिर

राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत मिळविण्यासाठी दाखल कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाबाबत माहिती आणि मदत करण्यासाठी नगरसेवक संजय वाघुले यांच्या वतीने आजपासून ३० मे पर्यंत शिबिर सुरू करण्यात आले आहे. भारतीय जनता चालक-मालक संघटनेच्या वतीने वाघुले यांच्या दादा पाटील वाडी येथील जनसंपर्क कार्यालयात रिक्षाचालकांना मोफत मार्गदर्शन आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी मदत जाहीर केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत होती. या विषयावर वाघुले यांनी रिक्षाचालकांच्या वतीने आवाज उठविला होता. तसेच तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. अखेर या संदर्भात राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणी करण्याचे जाहीर केले. मात्र, ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी रिक्षाचालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधार कार्ड, आधार कार्डवर मोबाईल क्रमांक लिंक नसणे आदींसह अनेक समस्या उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहील. इच्छूक रिक्षाचालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading