पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट – पालकमंत्री

ठाणे महापालिकेनं हाती घेतलेल्या पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट झाला असून यापुढेही महापालिका वाघोबानगर आणि भास्करनगर परिसराचा विकास करण्यास कटिबध्द असेल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा उभारण्याबाबत पालिका उदासिन असल्याबद्दल आमदार संजय केळकर यांची नाराजी

राष्ट्र उभारणीसाठी संरक्षक यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा बसवण्यास महापालिकेला रस नसल्याबद्दल आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read more

सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं मूक धरणं आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं मूक धरणं आंदोलन केलं.

Read more

शिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी

शिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं केली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून १ हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड असा लाभ मिळणार आहे.

Read more

राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध

राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खेळण्यातील तसेच कागदी विमानं उडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध करण्यात आला.

Read more

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सभागृहात कोंडी केली.

Read more

कळव्यातील वाघोबानगर आणि भास्करनगरच्या विकासासाठी १२ कोटींचा विशेष निधी

कळव्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या वाघोबानगर आणि भास्करनगरच्या विकासासाठी १२ कोटींचा विशेष निधी दिला जाणार आहे.

Read more

आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ

ठाण्यातील आनंदनगर या झोपडपट्टीचा कायापालट केला जाईल आणि येथे होणारा गृहप्रकल्प पाहण्यास ठाण्याबाहेरून लोकं येतील अशी दर्जेदार घरं येथील नागरिकांना मिळतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

मतदार याद्या आधारशी संलग्न करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी

सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वैधतेला मान्यता दिली असल्यानं आता मतदार याद्याही आधारशी संलग्न कराव्यात जेणेकरून मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात आणणे सोपे होईल अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more