समन्वय प्रतिष्ठानच्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समन्वय प्रतिष्ठान आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मो. ह. विद्यालयात आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासांतच तीन हजार नागरिकांची नोंदणी संपली. या नागरिकांना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली. राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शहरातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर समन्वय प्रतिष्ठानतर्फे अपोलो क्लिनिकच्या सहकार्याने आजपासून तीन दिवसांचे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीची खासगी हॉस्पिटलमधील किंमत प्रती डोस १ हजार रुपये आहे. मात्र सीएसआर माध्यमातून २०० रुपयांची सवलत देऊन ८०० रुपये आकारले जात आहेत. या शिबिरासाठी नोंदणी खुली झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ती संपुष्टात आल्याची माहिती डावखरे यांनी दिली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading