सहायक आयुक्तांना दमदाटी करणाऱ्यालाच ठाणे महापालिकेने केला गाळा बहाल

महापालिकेच्या सहायक आयुक्ताला दमदाटी केल्यानंतर तुरुंगात गेलेल्या फेरीवाल्यालाच महापालिकेने गावदेवी भाजी मंडईतील दुकान बेकायदेशीररित्या बहाल केले आहे.
महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने केलेला हा धक्कादायक गैरव्यवहार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी उघड केला आहे. तसेच या प्रकरणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

गावदेवी मंडईत १५४ ओटले (गाळे) उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे १५५ गाळे उभारले गेले. त्यातील ३६ क्रमांकाचा गाळा मिळालेल्या श्याम लोखंडे यांच्या भाजी विक्री व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून लोखंडे यांना मंडईबाहेर गाळा बांधून देण्यात आला. त्यानंतर लोखंडे यांच्या ताब्यातील गाळा क्रमांक ३६ हा महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने बाबासाहेब खेडकर यांना बहाल केला. त्या प्रकारची नोंद स्थावर मालमत्ता विभागाच्या कागदपत्रात आढळली आहे. या बेकायदेशीर प्रकाराविरोधात भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आवाज उठविला आहे.
मालमत्ता विभागाने गाळा दिलेल्या बाबासाहेब खेडकर याच्यावर महापालिकेच्या तत्कालीन सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर वर्तक नगर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ३६१/ २०२० नुसार ८ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला १२ दिवसांची कोठडीही ठोठविण्यात आली होती. अशा आरोपी फेरीवाल्यालाच महापालिकेने गाळा दिल्याने स्थावर व मालमत्ता विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावदेवी मार्केट मध्ये १५४ गाळेधारक होते. मात्र, १५५ गाळे बांधले गेले. या मार्केटमधील एक जास्त गाळा हा कोणत्याही रस्ते वा प्रकल्पात बाधित न झालेल्या धर्मेंद्र वाघुले यांना देण्यात आला. सध्या १५५ क्रमांकाचा हा गाळा धर्मेंद्र वाघुलेंच्याच ताब्यत आहे. त्याच्यावर स्थावर व मालमत्ता विभागाने मेहेरनजर का दाखवली, असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे.
काही वर्षांपूर्वी गावदेवी भाजी मंडईलगत असलेल्या एका गाळेधारकाने रस्त्यात ठेवलेला माल महापालिकेच्या उपायुक्ताने जप्त केला होता. त्यावेळी त्या गाळेधारकाने चक्क उपायुक्तालाच धक्काबुक्की केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्या गाळेधारकाचा गाळा असलेले संपूर्ण संकुलच जमीनदोस्त केले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व फेरीवाल्यांची अरेरावी सहन करणार नाही, असा संदेश त्यांनी दिला होता. मात्र, आता सहायक आयुक्ताला दमदाटी करणाऱ्या समाजकंटक फेरीवाल्याला महापालिकेच्या मालकीचा गाळा देण्याचा पराक्रम स्थावर मालमत्ता विभागाने केला आहे, याबद्दल संजय वाघुले यांनी संताप व्यक्त केला.

Read more

गोखले रस्त्यावरील दोन वेळा चोरीला गेलेला बस थांबा पुन्हा जागेवर

नौपाड्यातील ए. के. जोशी शाळेजवळ उभारलेला टीएमटीचा बस स्टॉप चक्क दोन वेळा चोरीला गेला असल्याचे उघड झाले.

Read more

पालिकेची दुकानदारांवर कारवाई; तर फेरीवाल्यांना `पायघड्या’

कोरोना निर्बंध लागू केल्यानंतर शनिवारी-रविवारबरोबरच सायंकाळी ४ नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या नौपाड्यातील दुकानदारांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. तर बेकायदा फेरीवाल्यांसाठी अतिक्रमण विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून `पायघड्या’ टाकल्या जात आहेत, असा आरोप नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे.

Read more

रिक्षाचालकांच्या मदत अर्जांसाठी संजय वाघुलेंच्या वतीने शिबिर

राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत मिळविण्यासाठी दाखल कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाबाबत माहिती आणि मदत करण्यासाठी नगरसेवक संजय वाघुले यांच्या वतीने आजपासून ३० मे पर्यंत शिबिर सुरू करण्यात आले आहे.

Read more

३१ मे पर्यंत नोंदणी करणाऱ्या घरेलू कामगारांना लाभ देण्याची संजय वाघुलेंची मागणी

राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन काळासाठी देण्यात येणारे लाभ येत्या ३१ मेपर्यंत नोंदणी करणाऱ्या घरेलू कामगारांना द्यावेत, अशी आग्रही मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फार्स ठरल्याचा संजय वाघुलेंचा आरोप

लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे.

Read more

नौपाड्यातील गरजू, गरीब कुटुंबांना महात्मा फुले जन आरोग्य कार्डची भेट

कोरोना आपत्तीच्या काळात आर्थिक उत्पन्न बेताचे असलेल्या नौपाड्यातील शेकडो कुटुंबांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्डची भेट मिळाली आहे.

Read more

वृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत दोघांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची संजय वाघुलेंची मागणी

मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक आणि प्रवाशाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more

ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना पितृशोक

ठाण्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी संतु वाघुले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

Read more

पार्किंग प्लाझा गैरव्यवहार प्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची संजय वाघुलेंची मागणी

पोखरण रोड क्रमांक दोन येथील पार्किंग प्लाझा गैरव्यवहारप्रकरणी संबंधित
कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच महापालिकेच्या ठरावाची
अंमलबजावणी न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,
अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more