शिवसेनेचे माजी ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी शिवसेनेला राम राम ठोकला असून जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर म्हात्रे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती त्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजी होती. अखेर वैयक्तीक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं पत्र पाठवून आपला राजीनामा दिला आहे. सुरेश म्हात्रे हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.