इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार फलकबाजी

भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळात इंधन दरवाढीचा आलेख वाढतच असून या महिन्यात १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यात जोरदार फलकबाजी करण्यात आली. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. पेट्रोल आज 100 रूपये 4 पैसे आणि डिझेल 91 रूपये 87 पैसे प्रति लिटर आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. संपूर्ण ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. “मॅन ऑफ दि मॅच- पेट्रोल 100 नॉट आऊट, अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा संदेशही या फलकांवर लावण्यात आला आहे. या फलकांची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. गेले काही दिवस सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात फलक लावले आहेत. त्यावर एक बॅट्समॅनचे चित्र आहे. त्याला आम्ही मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार दिला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते बहुत हुई महँगाई की मार-अब की बार मोदी सरकार असे ओरडत होते. मात्र आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे. यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढं महाग झाले नव्हते. त्यामुळेच मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे फलक लावण्यात आल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading