कोरोना संदर्भात समाज माध्यमांवर खोट्या बातम्या अथवा अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा

कोरोना संदर्भात समाज माध्यमांवर खोट्या बातम्या अथवा अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.

Read more

हरियाना सरकारप्रमाणेच राज्यातील आरोग्य सेवेतील कर्मचा-यांचं वेतन दुप्पट करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय तसंच अशासकीय सेवेतील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना हरियानाप्रमाणेच दुप्पट वेतन देण्याबरोबरच राज्यातील पोलीसांना वेळेवर वेतन कसं मिळेल याची दक्षता घेऊन त्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्याची मागणी ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Read more

परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित काळात चालवल्या जाणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत.

Read more

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्जनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस् निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.

Read more

शहरातील काही भागातील औषध फवारणी ठप्प झाल्याचा नारायण पवार यांचा आरोप

कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची भीती असतानाच ठाणे शहरातील काही भागात औषध फवारणी ठप्प झाली आहे.

Read more

दूध पुरवठा सुरळीत असल्यानं दूधासाठी धावपळ न करण्याचं शहर दूध विक्रेता संघटनेचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं काही निर्बंध जारी केले असले तरी शहराला होणारा दूध पुरवठा योग्यरितीनं सुरू आहे तरी ग्राहकांनी दूधासाठी धावपळ करू नये असं आवाहन ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेनं केलं आहे.

Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीला आळा घालण्याकरिता कोकण विभागीय आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई केली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश – अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे पोलीसांचे आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी करण्याव्यतिरिक्त लोकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.

Read more

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची टीसाची मागणी

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी टीसा म्हणजे ठाणे लघुउद्योजक संघटनेनं उर्जामंत्र्यांकडे केली आहे.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणा-या शासकीय सेवेतील कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवण्याच्या केलेल्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला.

Read more