दूध पुरवठा सुरळीत असल्यानं दूधासाठी धावपळ न करण्याचं शहर दूध विक्रेता संघटनेचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं काही निर्बंध जारी केले असले तरी शहराला होणारा दूध पुरवठा योग्यरितीनं सुरू आहे तरी ग्राहकांनी दूधासाठी धावपळ करू नये असं आवाहन ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेनं केलं आहे. काल जनता कर्फ्यु संपल्यानंतर आज पहाटे दूध विक्रेत्यांकडे गर्दी झाल्याचं दिसत होतं. उद्या दूध पुरवठा बंद झाला तर काय या भीतीनं अनेकांनी तीन तीन चार चार लिटर दूध खरेदी केलं. मात्र दूधाचा पुरवठा सुरळीत सुरू असून मागणी केल्याप्रमाणेच दूध मिळत आहे त्यामुळं कोणीही घाबरून दूधाची अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading