वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची टीसाची मागणी

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी टीसा म्हणजे ठाणे लघुउद्योजक संघटनेनं उर्जामंत्र्यांकडे केली आहे. उर्जामंत्र्यांनी वीज ग्राहकांना गेल्या महिन्याप्रमाणे सरासरी बील आकारावं असे आदेश दिले असून या पार्श्वभूमीवर टीसानं ही मागणी केली आहे.
टीसा ही औद्योगिक संस्था सुमारे चार हजार उद्योगांचे प्रतिनिधीत्व करते आणि 44 वर्षे कार्यरत आहे परंतु ह्या निर्णयाने सध्याच्या परिस्थितीत काहीही फायदा होणार नाही कारण कोरोना मुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व कंपन्या ,ऑफिस ,आस्थापना बंद आहेत, अजून किती दिवस बंद ठेवावे लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे पैसे भरताच येणार नाहीत. अशा परिस्थितीत महत्त्वाचे असे की ऊर्जा विभागाने फिक्स चार्जेस, वीज शुल्क ग्राहकास आकारण्यात येऊ नयेत आणि वीज बिलाची तारीख पुढे ढकलावी तसेच कोणत्याही ग्राहकाला पॉवर फॅक्टर पेनल्टी देखील लावु नये अशी विनंती टिसानं उर्जामंत्र्यांना केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading