ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश – अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे पोलीसांचे आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी करण्याव्यतिरिक्त लोकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे. बँक, एटीएम, मेडिकल स्टोअर्स यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या आस्थापनांचे काचेचे दरवाजे उघडे ठेवावेत. किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स, डी-मार्ट, भाजी विक्रेते या ठिकाणी खरेदी करणाऱ्या नागरिकांनी रांगेत कमीत कमी ४ फूट सुरक्षित अंतर ठेवून उभे राहून गर्दी न करता वस्तू खरेदी कराव्यात. तसेच कॅश काउंटरवर गर्दी करू नये. ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांखालील मुले यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना विशेष धोका असल्याने त्यांनी घरातच राहावे. नागरी वस्तीमध्ये जमावबंदीचा आदेश लागू असल्याने कृपया घरीच रहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सुरक्षितता पाळणे हाच उपाय आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावं, कट्ट्यावर, चौकात गप्पा मारत बसू नका. साबणाने सतत हात स्वच्छ धुवा सॅनिटायझरचा वापर करा. मधुमेह, बीपी, हृदयरोग असा आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा अशी काही मार्गदर्शक तत्वं पोलीसांनी जारी केली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading