शहरातील काही भागातील औषध फवारणी ठप्प झाल्याचा नारायण पवार यांचा आरोप

कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची भीती असतानाच ठाणे शहरातील काही भागात औषध फवारणी ठप्प झाली आहे. महापालिकेकडील औषधसाठा संपुष्टात आल्यामुळे हा प्रकार झाला असल्याकडे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्त विजय सिंघल यांचे लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहराच्या विविध भागात डासांसह जंतूनाशकांबाबत फवारणी केली जाते. कोरोनाचे संकट गडद होत असताना, सातत्याने फवारणीची आवश्यकता आहे. मात्र, दोन दिवसांपासून शहरातील काही भागातील फवारणी बंद पडली आहे. आरोग्य विभागाकडे आवश्यक औषधसाठा नसल्यामुळे तात्पुरती फवारणी थांबविण्यात आली असा आरोप नारायण पवार यांनी पालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. विषाणूजन्य रोगाबाबत नागरिकांमध्ये सतर्कता आहे. अशा परिस्थितीत रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी आवश्यक आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी न घेतल्यामुळे फवारणी बंद पडली असा आरोप नारायण पवार यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading