महापालिका वर्धापनदिनाच्या निमंत्रणपत्रिकेत फडणवीसांचा विसर – नारायण पवार यांची हरकत

ठाणे महापालिकेच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा महापालिकेला विसर पडला आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी हरकत घेतली असून, नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read more

पाचपाखाडीतील साईनाथ नगर गृहनिर्माण संस्थेतील कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार

क्लस्टर प्रकल्पाची चर्चा सुरू असतानाच, पाचपाखाडीत तब्बल ३० ते ३५ वर्षांपासून घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या साईनाथ नगर गृहनिर्माण संस्थेतील २८२ हून अधिक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नगरसेवक नारायण पवार यांनी बिल्डर, महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सातत्याने प्रयत्न करीत तांत्रिक अडथळे दूर केल्यामुळे या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Read more

आनंद सावलीतील महिला तब्बल १२ वर्षानंतर एकत्र

महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आनंद सावली गृहसंकुलातील महिला तब्बल १२ वर्षाने प्रथमच एकत्र आल्या. या महिलांनी जल्लोष करीत आनंद साजरा करण्याबरोबरच एकमेकींशी हितगुज केले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Read more

नितीन कंपनीचा टीएमटी थांबाही दुकानांसमोरुन हलविला – नारायण पवारांचा आक्षेप

नौपाड्यातील साड्यांच्या दुकानासमोरील टीएमटीचा थांबा, पोखरण रोड क्र. २ वरील विश्रांती कट्टा परस्पर गायब झाल्याच्या घटना घडल्या असतानाच आता नितीन कंपनी येथील टीएमटीचा थांबा दुकानांसमोरून हलविण्यात आला आहे. नगरसेवक नारायण पवार यांनी थांबा हलविण्याच्या प्रकाराला आक्षेप घेतला असून पूर्वीच्याच ठिकाणी थांबा ठेवण्याची मागणी केली आहे.

Read more

मालमत्ता करमाफीपूर्वीच सहा वर्षांत २९ टक्के करवाढ नव्या इमारतींवर दुप्पट कराचे ओझे – नारायण पवारांची टीका

५०० चौरस फुटांपर्यंत घरांना मालमत्ता करमाफीचे शिवसेनेने `मृगजळ’ दाखविले असले तरी २०१२-१३ ते २०१७-१८ या सात वर्षांत ठाणेकरांवरील करात तब्बल २९ टक्के वाढ करण्यात आली. तर २०१६ मध्ये सुधारीत वाजवी भाडे आकारणी करुन नव्या मालमत्तांवर दुप्पट करांचे ओझे टाकण्यात आले अशी टीका नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा नारायण पवारांचा आरोप

महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Read more

गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या मागणीला महापालिकेकडून वाटाण्याच्या अक्षता शाखेत मात्र परवानगी – नारायण पवार

प्रामाणिकपणे महापालिकेचा हजारो रुपयांचा कर भरणाऱ्या गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या विनंतीला महापालिका प्रशासनाकडून `वाटाण्याच्या अक्षता’ दाखविल्या गेल्या. मात्र, चंदनवाडीतील शिवसेना शाखेत लसीकरण शिबिर घेण्यास महापालिकेने कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेला विचारला आहे.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जितेंद्र जैन यांचा आरोप

नगरसेवक नारायण पवार आणि त्यांच्या काही सहका-यांनी उथळसर येथील सहाय्यक आयुक्तांच्या दालनात असभ्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जितेंद्र जैन यांनी केला आहे.

Read more

शहर विकास विभागातील महत्वाच्या फाईलींना अतिवरिष्ठ अधिका-याकडून मागील तारखेवर मंजुरी दिली जात असल्याचा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

शहर विकास विभागातील महत्वाच्या वादग्रस्त प्रस्तावांबाबतच्या फाईल्स बेकायदेशीर पद्धतीने कार्यालयाबाहेर नेल्या जात आहेत. एका अतिवरिष्ठ माजी अधिकाऱ्याकडून बॅकडेटेड मंजूरी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Read more

ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत लसीकरण करण्याची नारायण पवारांची मागणी

ठाण्यातील सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत कोरोना लसीकरण करावे अशी आग्रही मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more