जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ आंतरमहाविद्यालयीन महोत्सव

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचं उद्घाटन झालं.

Read more

रविंद्र आंग्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक

ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराच्या विरोधात बंदी हुकूम मोडून मोर्चा काढल्याबद्दल रविंद्र आंग्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

Read more

संगीतसूर्य डॉ. वंसतराव देशपांडे चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

संगीत नाटकांना बालगंधर्वांनी सुवर्णकाळ निर्माण करून दिला. बालगंधर्व यांच्यामागे सयाजीराव गायकवाड आणि अनेक दिग्गज भक्कम उभे होते, त्यामुळे बालगंर्धवांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविला, पण दुर्देवाने आज संगीत नाटकांच्या मागे कुणीही उभे नाही, संगीत नाटके पुन्हा व्हावीत, यासाठी आम्ही सर्व सत्ताधा-यांना भेटलो, संगीत रंगभूमीसाठी काही तरी करायला पाहिजे, हे सर्वांना मान्य आहे, पण संगीत रंगभूमी उपेक्षितच आहे, अशी खंत पं. सुरेश साखवळकर यांनी व्यक्त केली.

Read more

ठाणे महापालिकेच्या ४ प्रकल्पांचा स्कॉच पुरस्कारानं गौरव

प्रदूषण, हवामान मॉनिटरिंग ॲप, डीजी ठाणे, प्रॉपर्टी टॅक्स ॲसेसमेंट मॉड्युल आणि ग्रीन ठाणे या ४ प्रकल्पांना स्कॉच या संस्थेनं चार ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारानं गौरवलं आहे.

Read more

शिवसेनेच्या गणेश दर्शन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ४ लाखांची पारितोषिकं दिली जाणार

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेनं यंदाही जिल्हा स्तरावरील श्रीगणेश दर्शन स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ४ लाखांची पारितोषिकं दिली जाणार आहेत.

Read more

हिंदू संस्कृतीतील मातेचं महत्व सांगणारा मातृदिन आज साजरा

श्रावण अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. जन्म देणारी माता ही मोठी असल्याचं बिंबवण्यासाठी लहानपणापासूनच मातृदिन साजरा केला जातो.

Read more

साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचा-यांच्या भविष्य निधीमध्ये केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी

ठाणे महापालिकेनं साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची ९४४ कोटींची थकबाकी

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटी रूपयांवर पोचल्यानं ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासह ९० टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय पाटील यांनी दिले आहेत.

Read more

परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली – दिवाकर रावते

परिवहन विभागाचा प्रत्येक घराशी संबंध असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दळणवळणाच्या गरजा भागवताना विभागाच्या वाहनांचा वापर करते. त्यामुळं परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं.

Read more

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्यला बियाथल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्य हिनं मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या दहाव्या बियाथल नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more