श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही मुहुर्त – दा. कृ. सोमण

भाद्रपद शुक्ल चतुर्थी २ सप्टेंबर रोजी असून त्याच दिवशी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळं सोमवार २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेश मूर्ती स्थापना आणि पूजन करावं अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा गौरव

खेळाडू असो की सामान्य नागरिक शारिरीक तंदुरूस्तीला पर्याय नाही. प्रामाणिक कष्ट घेतल्यास यश नक्कीच मिळते असं प्रतिपादन रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर यांनी नेशन प्राईड नाईन उपक्रमांतर्गंत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात केले.

Read more

ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

निवडणुकीआधी शिवसेना-भारतीय जनता पक्षानं ठाणेकरांना टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन पाळण्यात आलं नाही. त्यामुळं टोलमुक्तीसाठी आपण रस्त्यावर उतरणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read more

ठाण्यातील खड्डे बुजवण्यास सत्ताधारी अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ संजय घाडीगावकर यांनी घातलं खड्ड्यांचे विधीवत श्राध्द

ठाण्यातील खड्डे बुजवण्यास सत्ताधारी अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ ठाणे फर्स्टच्या संजय घाडीगावकर यांनी तीन हात नाका येथे खड्ड्यांचे विधीवत श्राध्द घातले.

Read more

ठाणेकरांनी पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावं – महापौर

पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवणा-या ठाणे महापालिकेनं यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. ठाणेकरांनी पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं आहे.

Read more

ए के जोशी शाळेत गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचं स्वागत

ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात टाळ वाजवून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं.

Read more

ठाण्यातही राष्ट्रवादीमध्ये फुटीचं बीज

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वावर टीकेची तोफ डागत गटनेते पदाचा राजीनामा दिल्यानं ठाण्यातही राष्ट्रवादीमध्ये फुटीचं बीज पडल्याचं दिसत आहे.

Read more

शेतक-यांचा जिव्हाळ्याचा सण म्हणून बैलपोळा पारंपरिक पध्दतीनं साजरा

श्रावण महिना म्हटलं की सणांची उधळण असते. श्रावणातील अमावास्येला बैलपोळा साजरा केला जातो.

Read more

गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोलचा वापर झाल्यास ५ हजार रूपये दंड

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सजावट अथवा अन्य गोष्टींसाठी थर्माकोलचा वापर होताना आढळल्यास ५ हजार रूपये दंडाचा इशारा ठाणे महापालिकेनं दिला आहे.

Read more

सहाय्यक पोलीस अधिकारी स्नेहा कर्नाले यांची वर्ल्ड पोलीस गेम्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस अधिकारी पदावर काम करणा-या स्नेहा कर्नाले यांनी चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस गेम्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे.

Read more