स्वमग्न असलेल्या सानिका वैद्यला बियाथल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्य हिनं मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या दहाव्या बियाथल नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी येथे झाली. विशेष मुलींच्या ग्रुप गटामध्ये सानिकानं दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदक जिंकलं आहे. बियाथल या स्पर्धेचं स्वरूप २०० मीटर धावणं, ५० मीटर पोहणं आणि परत २०० मीटर धावून शर्यत पूर्ण करणं असं असतं. अशा विविध प्रकारच्या क्रिया एकाच वेळी करणं हे स्वमग्न मुलांना कठीण जातं. तरीही यावर मात करून सानिकानं मिळवलेलं यश वाखाणण्याजोगं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading