महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची ९४४ कोटींची थकबाकी

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटी रूपयांवर पोचल्यानं ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासह ९० टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय पाटील यांनी दिले आहेत. कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणा-या १२ जिल्ह्यातील कार्यरत अधिका-यांच्या कामाचा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेताना त्यांनी हे आदेश दिले. ठाणे नागरी मंडळाची १९५ कोटी, कल्याण परिमंडळाची २५४ कोटींची थकबाकी आहे. वीज बील थकीत ग्राहकांचा पुरवठा तात्काळ तोडा, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांनी अनधिकृत वीज पुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरूध्द गुन्हा नोंदवा, पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू करू नका असे आदेश विजयकुमार पाटील यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading