गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोलचा वापर झाल्यास ५ हजार रूपये दंड

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सजावट अथवा अन्य गोष्टींसाठी थर्माकोलचा वापर होताना आढळल्यास ५ हजार रूपये दंडाचा इशारा ठाणे महापालिकेनं दिला आहे. शासनानं प्लास्टीक आणि थर्माकोलच्या उत्पादन, वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळं गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टीक आणि थर्माकोलच्या वस्तूंचा वापर करू नये असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी केला जाणारा थर्माकोलचा वापर त्याचप्रमाणे ताटं, वाट्या, कप, ग्लास अशा वस्तूंच्या वापराचं प्रमाणही जास्त आहे. या वस्तू विघटन न होणा-या असल्यानं त्याचा वापर होताना पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार, दुस-यांदा आढळल्यास १० हजार तर तिस-यांदा आढळल्यास २५ हजार रूपये दंड आणि तीन महिने शिक्षेची तरतूद आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवादरम्यान सजावटीसाठी जास्तीत जास्त पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading