श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही मुहुर्त – दा. कृ. सोमण

भाद्रपद शुक्ल चतुर्थी २ सप्टेंबर रोजी असून त्याच दिवशी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळं सोमवार २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेश मूर्ती स्थापना आणि पूजन करावं अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. गणेश मूर्ती स्थापना आणि पूजन राहूकाल आणि भद्रकालात करता येते असंही सोमण यांनी स्पष्ट केलं. गुरूवार ५ सप्टेंबर रोजी दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यानं दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी आणाव्यात. शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. शनिवार ७ सप्टेंबर रोजी दिवसभर मूळ नक्षत्र असल्यानं दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी विसर्जन करावं असं सोमण यांनी सांगितलं. अनंत चतुर्दशी म्हणजे गुरूवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी आणि रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी समुद्राला भरती असेल असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading