राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा गौरव

खेळाडू असो की सामान्य नागरिक शारिरीक तंदुरूस्तीला पर्याय नाही. प्रामाणिक कष्ट घेतल्यास यश नक्कीच मिळते असं प्रतिपादन रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर यांनी नेशन प्राईड नाईन उपक्रमांतर्गंत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात केले. या कार्यक्रमात रोप मल्लखांब करणारी वैशाली कानगुणे, आंतरराष्ट्रीय गोळाफेक पटू अग्रता मेलकुंडे, राष्ट्रीय रग्बीपटू देवांगी मोहपे, तिरंदाज वैभव पवार, सात हजार किलोमीटर उंचीवर असलेल्या रोहतांग पास मोटरसायकलवरून गाठणारी अंकिता कार्लेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेती नेहा पुजारी, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट किमया फुलपगार, जलतरणपटू शुभम वनमाली, राष्ट्रीय बॉक्सर नीलम यादव या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading