ग्लोबल हॉस्पीटलमध्ये ऑनलाईन नोंदणीनंतरही गोंधळ कायम

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच कडक निर्बंध जारी करण्यात आले असले, तरी ठाण्यातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलबाहेर लसीकरणासाठी शनिवारी गर्दीचा महापूर उसळला.

Read more

लसीकरणात पिनकोड नुसार स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची नारायण पवारांची मागणी

ऑनलाईन बुकिंगमध्ये शहरवासीय अल्प, नारायण पवार यांनी वेधले लक्ष ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रात शहरातील नागरिकांकडून ऑनलाईन बुकिंग होत असल्याचे उघड झाले असतानाच, आता ठाणे शहरातील लसीकरण केंद्रांवरही मुंबई, नवी मुंबईसह अन्य शहरांतील नागरिकांची संख्या लक्षणीय असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कोविन अॅपवर लसीकरणासाठी … Read more

कोरोना आपत्तीत ठाणेकरांचे हाल होत असल्याबाबत नारायण पवारांची महासभेत लक्षवेधी

कोरोना आपत्तीमध्ये ठाणेकरांचे हाल होत असून रूग्णांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरं जावं लागत असल्याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी आज झालेल्या महासभेत लक्षवेधी सूचना मांडली.

Read more

ठेकेदारांच्या ठोक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची ४९९ कोटींची रक्कम महापालिकेनं भरण्याची भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची मागणी

महापालिकेच्या परिवहन सेवा, घनकचरा निर्मूलन, आरोग्य सेवेतील ठेकेदारांनी ठोक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच पीएफ कार्यालयाकडे जमा केली नाही. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत ठेकेदारांची बिले मंजूर केल्यामुळे २०११ ते २०१५ या वर्षात तब्बल ४१९ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. पीएफच्या अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या तपासणी अहवालात संबंधित रक्कमेचा भरणा करण्याची सुचना महापालिकेला दिली आहे. मात्र, त्याबाबत महापालिकेने जबाबदारी झटकली आहे. या गंभीर प्रकाराकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधून चौकशीची मागणी केली आहे.

Read more

उत्पन्नात झालेली घट, अनेक योजनांना लागलेली कात्री आणि कोरोना आपत्तीमध्येही कबड्डीचा व्यावसायिक संघ उभारण्यासाठी पालिका खर्च करणार ७० लाख रूपये

कोरोना आपत्तीमुळे विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांमध्ये कपात करण्यात आली. मात्र, कोरोना काळातच महापालिकेच्या कबड्डी प्रेमाला भरते आले आहे. कबड्डीचे पुरुष आणि महिलांचे व्यावसायिक संघ उभारण्यासाठी ११ महिन्यांत तब्बल ६९ लाख ५५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या उद्या होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्याला नगरसेवक नारायण पवार यांनी तीव्र विरोध केला आहे.

Read more

नारायण पवार यांच्या प्रयत्नांना यश, जाहिरात हक्काची सर्वच कंत्राटे रद्द करा

ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाडेतत्वावर सायकलींच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे जाहिरातीचे हक्क पदरात पाडून घेणाऱ्या कंत्राटदाराचे हक्क रद्द करण्यासाठी महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनंतर १९ मार्च रोजी होणाऱ्या महासभेपुढे महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिलेल्या हक्कांबाबत विचार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर सायकल कंत्राटाबरोबरच महापालिकेने जाहिरातीच्या हक्काच्या बदल्यात केलेले अन्य करारही रद्द करण्याची मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टॅण्ड हटवून पालिकेचा उत्तुंग जाहिरात फलक

काही महिन्यांपूर्वी सायकल स्टॅण्डच्या उपयुक्ततेचा पुळका आलेल्या महापालिका प्रशासनाने आता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टॅण्ड हटवून उत्तूंग जाहिरात फलक उभारला आहे.

Read more

महापालिकेला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात टाकणारे जाहिरात करार सरसकट रद्द करण्याची नारायण पवारांची मागणी

शौचालय नको की सुशोभिकरण नको महापालिकेला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात टाकणारे जाहिरात करार सरसकट रद्द करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ

कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने घंटागाड्यांऐवजी कागदोपत्री डंपर आणि डिलीव्हरी व्हॅनची नोंद केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेचे लक्ष वेधले.

Read more

कोरोना रूग्णालयांचा भोजनाचा गोषवारा विषय पत्रिकेतून गायब – पालिका प्रशासनाची बनवाबनवी

महापालिकेच्या सचिव विभागाकडून नगरसेवकांची बनवाबनवी करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.

Read more