कोरोना आपत्तीत ठाणेकरांचे हाल होत असल्याबाबत नारायण पवारांची महासभेत लक्षवेधी

कोरोना आपत्तीमध्ये ठाणेकरांचे हाल होत असून रूग्णांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरं जावं लागत असल्याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी आज झालेल्या महासभेत लक्षवेधी सूचना मांडली. महापालिकेची व्होल्टास, बुश, बोरिवडे येथील रूग्णालयं बंद असून कौसा रूग्णालयही बंद आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन वाढीव बेड निर्माण करण्यात अपयशी ठरलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठीही रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. शहरातील रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यातही महापालिकेला अपयश आल्याचं या लक्षवेधीत म्हटलं आहे. महापालिकेच्या कोविड हॉस्पीटलमध्ये कर्मचा-यांची अपुरी संख्या असून एमबीबीएस किंवा बीएएमएस ऐवजी युनानी डॉक्टरांचा वापर होत आहे. तसंच निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट, बॉडीबॅगऐवजी रूग्णाचा मृतदेह प्लास्टीक पिशवीत बांधल्याचा धक्कादायक प्रकार आणि व्हेंटीलेटर खरेदी प्रकरणी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांना झालेली अटक यासंदर्भात नारायण पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading