कोरोना रूग्णालयांचा भोजनाचा गोषवारा विषय पत्रिकेतून गायब – पालिका प्रशासनाची बनवाबनवी

महापालिकेच्या सचिव विभागाकडून नगरसेवकांची बनवाबनवी करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतून कोरोना रूग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरला पुरवण्यात आलेल्या बिलांबाबतचा गोषवारा गायब करण्यात आला आहे. मात्र अति वरिष्ठ अधिका-यांना पाठवलेल्या विषय पत्रिकेत संबंधित प्रस्तावाची प्रत जोडण्यात आली आहे. या प्रकाराबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत कोरोना रूग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरला पुरवण्यात आलेल्या अवास्तव बिलांवरून नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे यावरून बातम्याही प्रसिध्द झाल्या होत्या. उद्या सर्वसाधारण सभा होत असून या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरील प्रकरण क्रमांक २८५ ते २९० मध्ये भोजन बिलांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र नगरसेवकांना पाठवण्यात आलेल्या विषय पत्रिकेत हे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. मात्र नारायण पवार यांनी एका वरिष्ठ अधिका-याची भेट घेतली तेव्हा त्याच्याकडील विषय पत्रिकेमध्ये हे प्रस्ताव देण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिका-यांकडील विषय पत्रिकेत हे प्रस्ताव नव्हते. त्यामुळं गोषवा-याच्या निमित्तानं सचिव विभागाकडून नगरसेवकांची बनवाबनवी सुरू असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading