नारायण पवार यांच्या प्रयत्नांना यश, जाहिरात हक्काची सर्वच कंत्राटे रद्द करा

ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाडेतत्वावर सायकलींच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे जाहिरातीचे हक्क पदरात पाडून घेणाऱ्या कंत्राटदाराचे हक्क रद्द करण्यासाठी महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनंतर १९ मार्च रोजी होणाऱ्या महासभेपुढे महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिलेल्या हक्कांबाबत विचार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर सायकल कंत्राटाबरोबरच महापालिकेने जाहिरातीच्या हक्काच्या बदल्यात केलेले अन्य करारही रद्द करण्याची मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील सायकल प्रकल्पाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील सायकल प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी महापालिका आयुक्त आणि या प्रकल्पाशी संबंधित दोन कंपन्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

Read more