राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक लढण्याचे ठरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष

महाराष्ट्र राज्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्याचे ठरवले आहे .याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.

मनोरमा नगर येथे खासदार निधितून ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण

मनोरमा नगर येथील आर मॉल शेजारी कल्पवृक्ष इमारती समोर नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक जयनाथ पुर्णेकर, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखाप्रमुख सागर ढवळे, आनंद जाधव, सुमित बोराटे, संजय … Read more

गणेशमूर्तीच्या सजावटीमध्ये मूर्तिकार दंग

ऑगस्ट महिना सरत असतानाच भाविकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.ठाण्यात मुर्तिकारांचीही लगबग वाढली असुन बाप्पाच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरत आहे. लखलखणाऱ्या खड्यांमुळे गणेशमूर्तीला वेगळीच झळाळी मिळाली आहे. गणेशाचा सोंडपट्टा, मुकुट, बाजूबंद, हातावर असलेल्या दागिन्यांतील कलाकुसर, त्यावर होणारे इमिटेशन वर्क यावर मूर्तीकारांनी विशेष कारागीरी केल्याचे दिसत आहे.ठाण्यात गणेश मूर्तीकार गणेशोत्सवाच्या तयारीत गढुन गेले आहेत. मूर्तीवर हिरे … Read more

Categories Art

मुंब्रा येथे एसटीपी टाकी साफ करताना मृत्यू झालेल्या सुरज मढवे यांच्या वारसांना नुकसान अखेर भरपाई

ठाणे महापालिकेच्या मुम्ब्रा प्रभागातील एका सोसायटीची मलटाकी करतांना टाकीतील विषारी वायूने गुदमरून दि. २९ मार्च २०२२ रोजी मृत्यू झालेला सफाई कामगार सूरज मढवे यांच्या वारसांना शेवटी दीड वर्षानंतर हायकोर्टाच्या दणक्याने महापालिकेला नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रकमेचा धनादेश १७ ऑगस्ट २०२३ रोजी पिडित कुटुंबाला दहा लाखाचा धनादेश द्यावा लागला.महापालिका प्रशासनाने कोर्टातून वारस दाखला आणून देण्याची … Read more

Categories TMC

विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अरविंद सुळे यांच निधन

गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या विश्वासय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अरविंद सुळे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुळे हे युको बॅंकेत नोकरीला होते. ते स्वतः उत्तम चित्रकार होते.नखांच्या साह्याने चित्र रेखाटण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा … Read more

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे ठाण्यात खड्डेविरोधी आंदोलन

ज्या ठिकाणी खड्डे पडले आहे त्या ठिकाणी झाडे लावून व आजूबाजूला रांगोळी काढून प्रतीकात्मक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जेथे जेथे खड्डे दिसतील तेथे आंदोलन करा. असा इशारा दिल्यानंतर ठाण्यात माजीवाडा सर्व्हीस रोडवर मनसेने खड्डे आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी पुष्कर विचारे, स्वप्नील मंहिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली खड्यामध्ये प्रतिकात्मक … Read more

अधिकृत ईमारतीनंतर एस आर ए योजना क्लस्टर मुक्ती कडे – संजय केळकर

अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प देखील क्लस्टरमुक्त होतील, प्राधिकरण प्रशासन याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. क्लस्टर योजनेचे ४४ आराखडे जाहीर झाल्यानंतर त्या अंतर्गत प्रक्रिया सुरू असलेले सुमारे १६ एसआरए प्रकल्प रखडले. त्यामुळे घरही नाही आणि विकासाकडून भाडेही नाही, अशी कोंडी झालेल्या या प्रकल्पांमधील … Read more

कल्याण डोंबिवली मध्ये व्हाट्सअप वरून वाद

हाट्सअप वरून भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या जुंपली सायंकाळी एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्यासाठी दोघांनी कल्याण पूर्व येथील ड प्रभाग शेवटचा निवडला मात्र कोळसेवाडी परिसरात भारतात तणाव पाहताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची नारेबाजी तर दुसरीकडे पोलीस स्थानकाबाहेरच … Read more

नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी ठाणेकर मिलिंद मराठे यांची नियुक्ती

सोमय्या महाविद्यालयात दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केलेल्या ठाणेकर प्रा.मिलिंद मराठे यांची नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी असलेले मिलिंद मराठे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. अभियांत्रिकी शिक्षण प्रथम दर्जात उत्तीर्ण करून काही वर्ष त्यांनी कोल्हापूर, राजस्थान येथे पूर्णवेळ सामाजिक कार्य विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून केले होते. … Read more

मुलांची वाद झाला तरी चालेल पण संवाद पाहिजे – मेघना मेहंदळे

मुलांना मोकळे सोडा. मुलांशी वाद झाला तरी चालेल, पण संवाद पाहिजे! मुलांवर शिस्तीचा ताण नको, पालक हा मुलांचा दोस्त पाहिजे. पालकांनी आपल्या आकांक्षा त्यांच्यावर लादू नये, असे प्रांजळ मत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका मेघना मेहेंदळे यांनी व्यक्त केले. प्रा. मेहेंदळे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात त्या बोलत होत्या. ञानसाधना … Read more