राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे ठाण्यात खड्डेविरोधी आंदोलन


ज्या ठिकाणी खड्डे पडले आहे त्या ठिकाणी झाडे लावून व आजूबाजूला रांगोळी काढून प्रतीकात्मक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जेथे जेथे खड्डे दिसतील तेथे आंदोलन करा. असा इशारा दिल्यानंतर ठाण्यात माजीवाडा सर्व्हीस रोडवर मनसेने खड्डे आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी पुष्कर विचारे, स्वप्नील मंहिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली खड्यामध्ये प्रतिकात्मक वृक्षारोपण करून चवक रांगोळी काढुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. रस्त्यांसाठी शासनाने ६०५ कोटी निधी देऊनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तेव्हा ठाण्यात हे खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. असा आरोप करून मनसेसैनिकांनी प्रशासनाने खड्डे बुजवले नाही, तर भविष्यात मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading