गणेशमूर्तीच्या सजावटीमध्ये मूर्तिकार दंग

ऑगस्ट महिना सरत असतानाच भाविकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.ठाण्यात मुर्तिकारांचीही लगबग वाढली असुन बाप्पाच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरत आहे. लखलखणाऱ्या खड्यांमुळे गणेशमूर्तीला वेगळीच झळाळी मिळाली आहे.

गणेशाचा सोंडपट्टा, मुकुट, बाजूबंद, हातावर असलेल्या दागिन्यांतील कलाकुसर, त्यावर होणारे इमिटेशन वर्क यावर मूर्तीकारांनी विशेष कारागीरी केल्याचे दिसत आहे.
ठाण्यात गणेश मूर्तीकार गणेशोत्सवाच्या तयारीत गढुन गेले आहेत. मूर्तीवर हिरे लावणे , फेटे,धोतर नेसवुन बाप्पाला सजवणे अशा विविध सजावटीसाठी देखील गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. आकर्षक कलाकृती प्रमाणे मूर्ती सजावट केल्याने मूर्तीच्या किंमती देखील वाढल्याचे दिसुन येत आहे. डायमंड वर्क मूर्ती असल्यास मूळ किंमतीत दीड हजार रुपये व धोतर वाली मूर्ती असल्यास पाचशे ते आठशे रुपयांनी वाढ होते.असे विविध प्रकारचे मूर्तीचे भाव वाढत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading