मुंब्रा येथे एसटीपी टाकी साफ करताना मृत्यू झालेल्या सुरज मढवे यांच्या वारसांना नुकसान अखेर भरपाई


ठाणे महापालिकेच्या मुम्ब्रा प्रभागातील एका सोसायटीची मलटाकी करतांना टाकीतील विषारी वायूने गुदमरून दि. २९ मार्च २०२२ रोजी मृत्यू झालेला सफाई कामगार सूरज मढवे यांच्या वारसांना शेवटी दीड वर्षानंतर हायकोर्टाच्या दणक्याने महापालिकेला नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रकमेचा धनादेश १७ ऑगस्ट २०२३ रोजी पिडित कुटुंबाला दहा लाखाचा धनादेश द्यावा लागला.
महापालिका प्रशासनाने कोर्टातून वारस दाखला आणून देण्याची अट नुकसान भरपाई देण्यासाठी दिरंगाई करत असल्याने घरातील कमवता मुलगा गमावल्यावर त्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. या अवस्थेत त्यांच्या मदतीला धावून श्रमिक जनता संघाने मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन करून न्यायाची मागणी केली होती. मुंबई हायकोर्टाने दि. १८ जुलै २०२३ रोजी अंतरिम आदेशानुसार वारसांमध्ये विवाद नसल्यास चार आठवड्यात नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे ठाणे महानगरपालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार मृतक सूरज मढवेच्या वारसदार वडील राजू मढवे यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यात श्रमिक जनता संघाला यश मिळाले. नुकसान भरपाईची रक्कम मिळतांना राजू मढवे आणि त्याची पत्नी अतिशय भावुक झाले होते. त्यांनी श्रमिक जनता संघाच्या नेत्या मेधा पाटकर, सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि म्युज फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
हायकोर्टाच्या या निर्णयामुळे दूषित गटार, सीवर चॅम्बर्स, बंद ड्रेनेज लाईन आणि एसटीपी टाकी सफाई करताना मृत्यू झाल्यास त्वरीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या केस मध्ये युनियन तर्फे ज्येष्ठ वकील अॅड गायत्री सिंग यांनी बाजू मांडली होती. या प्रकरणात युनियनचे उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, अॅड.सुधा भारद्वाज, अॅड.दिपाली, म्युज फाऊंडेशनचे श्रयेश, राकेश घोलप, नेहाली जैन समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले, सुनिल दिवेकर आदींनी वेळोवेळी विशेष श्रम घेतले होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading