नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी ठाणेकर मिलिंद मराठे यांची नियुक्ती

सोमय्या महाविद्यालयात दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केलेल्या ठाणेकर प्रा.मिलिंद मराठे यांची नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी असलेले मिलिंद मराठे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. अभियांत्रिकी शिक्षण प्रथम दर्जात उत्तीर्ण करून काही वर्ष त्यांनी कोल्हापूर, राजस्थान येथे पूर्णवेळ सामाजिक कार्य विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून केले होते. नेटसेट परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी अध्यापनाचे काम केले. विविध शैक्षणिक समित्यांवर ते कार्यरत होते. नवीन शैक्षणिक धोरणाचे अभ्यासक असलेले प्रा. मिलिंद मराठे त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहेत. अभ्यासू, सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या प्रा.मिलिंद मराठे आपली निवड सार्थ ठरवतील असा विश्वास आहे. नॅशनल बुक ट्रस्टचा मूळ उद्देश सांभाळून ट्रस्टचे काम लोकाभिमुख करतील. प्रा.मिलिंद मराठे यांचे अभिनंदन आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा !

  • मकरंद मुळे

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading