प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो – जितेंद्र आव्हाड

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो लोकांच्या मनात जावे लागते,धर्मवीर आनंद दिघे असताना देखील या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते आणि त्यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे त्यांचा वारसा पुढे चालवत असून नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Read more

तिसरा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा

ठाणे महापालिका आणि विद्या प्रसारक मंडळाचे बी.एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय यांच्याद्वारे संयुक्तपणे तिसरा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात आला.

Read more

ठाण्यात संध्याकाळनंतर वीजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस

ठाण्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास अर्धा ते पाऊण तासात ३२ मिलीमीटर पाऊस झाला.

Read more

कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम क्रमाकांचे विजेते

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली श्री गणेश दर्शन स्पर्धेच्या परंपरेचा वसा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवला आहे. यंदा घेण्यात आलेल्या शिवसेना ठाणे जिल्हा गणेश स्पर्धेत ‘पृथ्वी रक्षण आणि जीवन’ या विषयावर देखावा साकारलेल्या कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी जाहीर केले.

Read more

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील – जितेंद्र आव्हाड

रेल्वे हा देशातील ऐतिहासिक ‘गेंडा’ आहे. त्यांना ऊन, वारापाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्ेवच्या बाबतीत राग पेटतोय; ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जर, सकाळच्या वेळी सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल? प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही, असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Read more

महाराष्ट्र स्पोर्टस क्लब संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं गणेशोत्सवाचं ५०वं वर्ष

मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी सणावाराची जी मूळ संकल्पना होती; ती फारच दूर गेली आहे. लोकांना मनोरंजनाची साधने आपल्या हातात मिळाली आहेत. तरीही, जनजागृती, स्थानिकांच्या कलागुणांना वाव देणे अन् लोकांना एकत्र आणण्याची जी मूळ संकल्पना होती त्या संकल्पनेला अनुसरुन उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्टस क्लब संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेली 50 वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव मंडळाची 1973 मध्ये जनार्दन वैती यांनी काही तरुणांच्या साथीने स्थापना केली होती.

Read more

ठाणे महापालिकेचा गणेशोत्सव अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहात साजरा – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका कर्मचारी श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सपत्नीक सत्यनारायणाची महापूजा केली.

Read more

पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या निनादात १२ हजाराहून अधिक गणेशमूर्ती तर १ हजाराहून अधिक गौरींना भक्तीभावपूर्ण निरोप

पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या निनादात १२ हजाराहून अधिक गणेशमूर्ती तर १ हजाराहून अधिक गौरींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.

Read more