ठाण्यात संध्याकाळनंतर वीजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस

ठाण्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास अर्धा ते पाऊण तासात ३२ मिलीमीटर पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. साधारणत: ५ च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या चमचमाटात पाऊस सुरू झाला. हा पाऊस इतका जोरदार होता की अवघ्या काही मिनिटात ३० मिलीमीटर पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. वंदना चित्रपटगृह तसंच ठाण्याच्या इतर काही भागात पाणी साचलं होतं. या पाण्यातूनच वाहन चालकांना तसंच पादचा-यांना वाट काढत चालावं लागत होतं. ठाण्यामध्ये आत्तापर्यंत २ हजार १५४ मिलीमीटर पाऊस झाला आहे तर गेल्यावर्षी जून ते आजपर्यंतच्या काळात २ हजार ९५७ मिलीमीटर पाऊस झाला होता. साधारणत: ८०० मिलीमीटर पाऊस यावर्षी कमी झाला आहे. नंतर रात्रीही ८ नंतरही पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. वीजांच्या कडकडाटात पुन्हा जोरदार सरी कोसळत होत्या. अवचित आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधातिरपीट उडाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading