जिल्ह्यात कोरोनाचे १२२ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १२२ नवे रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ७४८ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९४८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ४६ रूग्ण आढळले. सध्या ६३३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ९ रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या १६१ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६१ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ४१ नवे रूग्ण आढळले. सध्या ६७९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ६ रूग्ण आढळले. सध्या ७२ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ रूग्ण तर सध्या ९१ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६६३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ रूग्ण, सध्या १२ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ७ रूग्ण तर ३७ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४ रूग्ण आढळले. सध्या ६३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading