ठाणे महापालिकेचा गणेशोत्सव अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहात साजरा – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका कर्मचारी श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सपत्नीक सत्यनारायणाची महापूजा केली. ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी हा गणेशोत्सव अधिकारी, कर्मचारी उत्साहात साजरा करतात. परंतु यंदा मंडळाचे अध्यक्षपद भूषवित असतानाच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना आणि सत्यनारायण महापूजेचा मान मिळाला याचा विशेष आनंद वाटत असल्याचे सांगत गणेशोत्सवाचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापनाबद्दल आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ठाणे महापालिकेच्या वतीने गेली 40 वर्षे हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेली २ वर्षे कोरोनामुळे दीड दिवस गणेशाची स्थापना करण्यात आली होती. परंतु कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे यंदा गणेशोत्सव अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी महापालिका अधिकारी कर्मचा-यांच्या दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading